Ad will apear here
Next
रत्नागिरीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी अजूनही टिकून
विठ्ठल मंदिरातील दहीहंडीधमालनीच्या पारावरील हंडीरत्नागिरी : पाच ते आठ थरांपर्यंतच्या मोठमोठ्या हंड्या रत्नागिरीसारख्या शहरात होऊ लागल्या आहेत; मात्र राधाकृष्ण मंदिर, विठ्ठल मंदिरात साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी आजच्या आधुनिक युगातही टिकून आहे. मंदिरातील भोवत्या, पारंपरिक कृष्णनृत्य आणि तिसऱ्या थरावर हंडी फोडायची, विठ्ठल-रुक्मिणीला कृष्ण आणि राधेचं रूपं लावायचं, असा हा पारंपरिक उत्सव अजूनही साजरा केला जातो.

विठ्ठल-रुक्मिणीला कृष्ण-राधेची रूपं

सोमवारी (तीन सप्टेंबर) दहीकाल्याच्या दिवशी ‘मच गया शोर सारी नगरी रे,’ ‘गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला’ या जुन्या गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली. शहरात पाच-सहा थरांच्या दहीहंड्या सुरू झाल्या असल्या, तरी विठ्ठल मंदिरातील पारंपरिक उत्सवाला प्रतिवर्षाप्रमाणे रत्नागिरीकरांची भरपूर गर्दी झाली. इथली हंडी फुटल्यावर शहरात अन्यत्र हंड्या फोडण्यात आल्या.

राधाकृष्णाच्या उत्सवातील विठ्ठलाची पालखी आणि रथ





गोकुळाष्टमीनिमित्त येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीला कृष्ण-राधेची रूपं लावण्यात आली. विठ्ठल मंदिरात नटून थटून आलेल्या कृष्णाच्या वेषातील मुले व गोपिकांनी कृष्णगीतांवर नृत्ये सादर केली. त्यानंतर आरत्या, भजने म्हणत पाच भोवत्या घालण्यात आल्या. ‘एक, दोन तीन चार विठ्ठल मंदिरातील पोरं हुश्शार’ असे म्हणत मंदिरातील हंडी फोडण्यात आली. त्यानंतर दही-पोह्यांचा प्रसाद वाटण्यात आला.

गोखले नाका येथे हंडी फोडताना गोविंदा पथक आणि उत्सवासाठी झालेली गर्दी.





त्यानंतर गोखले नाका, राधाकृष्ण नाका, झारणी रोड, राम मंदिर या मार्गावरील हंड्या दुसऱ्या-तिसऱ्या थरावर फोडण्यात आला. या वेळी ‘गोविंदा रे गोपाळा’चा गजर करण्यात आला. गोखले नाक्यावरील हंडी प्रति वर्षीप्रमाणे गोपिकेने फोडली. या वेळी भाविकांची भरपूर गर्दी झाली होती. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. कृष्णाचा सजवलेला लाकडी रथ ओढण्यासाठी भाविकांची गर्दी झाली.

(दहीहंडीच्या वेळच्या उत्साही वातावरणाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZXSBS
Similar Posts
अभ्यंकर बालकमंदिरमध्ये दहीहंडी उत्सव साजरा रत्नागिरी : आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरमध्ये शुक्रवारी (२३ ऑगस्ट) दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कृष्ण व राधेच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये बालगोपाळांनी ‘गोविंदा रे गोपाळा’ गीतावर नृत्य सादर केले.
आनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिरात दहीहंडी रत्नागिरी : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरात एक सप्टेंबर २०१८ रोजी दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी बालगोपाळ पारंपरिक वेशभूषेत सजून आले होते.
आगाशे विद्यामंदिरात दहीहंडी उत्साहात रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात एक सप्टेंबर २०१८ रोजी दहीहंडीचा सण बालगोविंदांनी उत्साहात साजरा केला. मुला-मुलींनी विविध कृष्णगीतांवर फेर धरून नृत्याचा आनंद लुटला. त्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली.
कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात दहीहंडी उत्सव साजरा रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात शुक्रवारी (२३ ऑगस्ट) गोकुळाष्टमी व दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण, राधेच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये बालगोपाळांनी सुरेख नृत्ये सादर केली. ‘आला रे आला गोविंदा आला,’ ‘गोविंदा रे गोपाळा’ असा गजर मुलांनी केला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language